लोकसभेला भाजपच्या जागा घटणार : सर्व्हे

लोकसभेला भाजपच्या जागा घटणार : सर्व्हे

Published on

नवी दिल्ली: वृत्तसंस्था : सत्ताधारी भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजयाचे लक्ष्य ठेवत तयारीला प्रारंभ केला असला तरी भाजपच्या जागा सहा महिन्यांपूर्वीच्या सर्वेक्षणापेक्षा घटत असल्याचे जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वातील 'एनडीए'ला २९८ तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूपीए'ला १५३ जागा मिळू शकतात, असे हे ताजे सर्वेक्षण सांगते.

'आज तक' आणि 'सी व्होटर ने सहा महिन्यांपूर्वी ( ऑगस्ट २०२२) केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला ३०७ जागा मिळतील, असा अंदाज समोर आला होता; तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला १२५ जागांची शक्यता होती. त्याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष अशा १११ जागांचा अंदाज होता. पण जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या जागांमध्ये ९ जागांची घरसरण झाल्याचे समोर आले असून यूपीएच्या जागांमध्ये २८ ने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यावरून काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसत आहे, तर भाजपला त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात यूपीएची मतांची टक्केवारी २८ टक्के होती, ती जानेवारी २०२३ मध्ये २९ टक्के झाली. काँग्रेसच्या मतांमध्ये एक टक्का वाढ झाली आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता होती तर जानेवारी २०२३ मध्ये त्यांना ४३ टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. भाजपच्या मतांमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news