दिल्ली: महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात | पुढारी

दिल्ली: महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अमाप उत्साह आणि ढोल ताशांच्या गजरात देशाची राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रविवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खास नाशिकहून आलेल्या ढोलपथकाने आकर्षक गजर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी असंख्य मुलांनी शिवरायांसारखा पेहराव केला होता. तर पुरुष मंडळींनी भगवे फेटे घातले होते. नवीन महाराष्ट्र सदनाच्या समोर शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्याला शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज, कोल्हापूरचे युवराज शहाजीराजे यांच्यासह अन्य मान्यवरांनी वंदन केले. तत्पूर्वी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी शिवविचार या विषयावर सादरीकरणही केले.

हेही वाचा 

Back to top button