शिवजयंती : डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा? | पुढारी

शिवजयंती : डोळ्याचे पारणे फेडणारा महाराजांचा हा पुतळा कुठे आणि किती फुटांचा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या अशोकस्तंभ येथील साईबाबा मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल ६१ फूट मूर्ती साकारली आहे. मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, या भव्यदिव्य मूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती भाजप माथाडी सेलचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली.

यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह काही औरच असून, बहुतांश मंडळांनी दिव्य भव्य असे देखावे साकारले आहेत. त्यापैकी अशोकस्तंभ येथे शिवरायांची ६१ फूट मूर्ती साकारली जाणार आहे. सध्या या भव्य दिव्य देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात असून, कार्यकर्ते दिवसरात्र या देखाव्यासाठी परिश्रम घेत आहेत. ही मूर्ती बनविण्याचे काम ऑक्टोबर २०२२ पासून पिंपळगाव खांब येथे सुरू करण्यात आले होते. ३५ ते ४० कलाकारांची टीम मूर्ती साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशोकस्तंभ गणेशोत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष अक्षय भडांगे, उपाध्यक्ष स्वप्निल दिघोळे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन मोरे, सचिव सूरज कासार, उपसचिव अक्षय दवांडे, खजिनदार वैभव वीर, उपखजिनदार आनंद केदार, कार्यकारी सदस्य दर्शन घुले, परेश पाटील, बॉबी नेवारे, करण परदेशी, हेरंभ कुलकर्णी, मयूर थोरात, हर्षद निकम, मकरंद देशमुख, आनंद फरताळे, सुनील धुमणे, प्रशांत छल्लाणी, संतोष बोरेसे आदी मूर्ती साकारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती साकारण्याची गेल्या १० वर्षांपासून इच्छा होती. ती या शिवजयंतीला पूर्ण होत आहे. शिवजयंतीच्या दिवशी ५१ दाम्पत्यांच्या हस्ते राजेंची महाआरती केली जाईल. ही मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मंडळाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभले आहे.

– व्यंकटेश मोरे, संस्थापक अध्यक्ष, साईबाबा मित्रमंडळ

मूर्तीचे वैशिष्ट्य

उंची – ६१ फूट

रुंदी – २२ फूट

स्टील – ४ टन

एफआरपी फायबर – ४ टन

एकून वजन – ८ टन

कालावधी – २ महिने

कामगार – ६० ते ७०

हेही वाचा : 

Back to top button