मोठी बातमी : Air India आणखी ३७० विमान विकत घेणार; १० वर्षांत होणार व्यवहार पूर्ण | पुढारी

मोठी बातमी : Air India आणखी ३७० विमान विकत घेणार; १० वर्षांत होणार व्यवहार पूर्ण

४७० विमानांच्या जोडीनेच आणखी ३७० विमान खरेदीचा हक्क राखीव | Air India Option to buy additional 370 planes

पुढारी ऑनलाईन : टाटा समूहाची मालकी असलेली Air India अमेरिकेच्या बोईंग, आणि फ्रान्सच्या एअर बसकडून ४७० विमान विकत घेणार आहेच शिवाय अधिकची ३७० विमान विकत घेण्याचा हक्कही राखून ठेवलेला आहे. त्यामुळे Air Indiaचा व्यवहार अधिकच मोठा होणार आहे.

मंगळवारी Air Indiaने एअरबसकडून २५० तर बोईंगकडून २२० विमान विकत घेण्याचा व्यवहार जाहीर केला. नागरी विमान उद्योगातील हा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. पण हा व्यवहार यापेक्षाही मोठा ठरणार आहे.

Air Indiaचे वरिष्ठ अधिकारी असलेले निपूण अग्रवाल यांनी लिंक्डइनवर लिहिलेल्या पोस्टमध्ये या व्यवहाराची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “एअर इंडिया आणि भारतीय हवाई वाहतूक उद्योगासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ८४० विमानांची जी मागणी नोंदवली आहे त्याचा प्रवास Air Indiaच्या खासगीकरणानंतर सुरू झाला होता. एअर इंडिया आणि संपूर्ण भारत जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांशी जोडण्यासाठीची दृष्टी यातून दिसते.”

ते म्हणाले, “आम्ही जी मागणी नोंदवली आहे ती ४७० विमानांची आहे. तसेच ३७० विमान विकत एअरबस आणि बोईंगकडून विकत घेण्याच हक्क राखून ठेवले आहेत. एअरबसकडून आम्ही A-320/321 Neo / XLR आणि A350-900/1000 ही विमानं घेत आहोत. तर बोईंगकडून 737-Max, 787 and 777 या विमानांची खरेदी केली जाणार आहे.”

हेही वाचा

Back to top button