Airplane seats : विमानातील कोणत्या सीटस् असतात सुरक्षित? | पुढारी

Airplane seats : विमानातील कोणत्या सीटस् असतात सुरक्षित?

नवी दिल्ली : विमानातील कोणती सीट (Airplane seats) सर्वाधिक धोकादायक ठरू शकते आणि कोणती सीट कमी धोकादायक असते, याविषयी एव्हिएशन एक्स्पर्टस्नी माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, विमानातल्या मध्यभागी असलेल्या सीटस् निवडणार्‍या प्रवाशांना 44 टक्क्यांपर्यंत धोका असतो. सर्वात कमी धोकादायक जागा विमानातल्या मागच्या बाजूस असते. अपघात झाल्यास विमानाच्या काही सीटस्वर मृत्यूचा धोका का वाढतो, याचं कारणही तज्ज्ञांनी दिलं आहे. विमान प्रवासादरम्यान अपघात झाला, तर प्रवाशाच्या जीवाला धोका किती असेल हे त्याच्या सीटच्या स्थितीवरून समजू शकतं. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 105 विमान अपघातांवर संशोधन केलं आणि विमान अपघातांतून वाचलेल्या 2,000 प्रवाशांची माहिती गोळा केली.

जेव्हा विमानात आग लागण्याची घटना घडते तेव्हा विंडो सीटवर बसलेल्यांना सर्वाधिक धोका असतो. (Airplane seats) हे प्रवासी वाचण्याची शक्यता 53 टक्क्यांपर्यंतच असते. विमानाच्या पुढच्या बाजूच्या सीटवरचे प्रवासी वाचण्याची शक्यता 65 टक्क्यांपर्यंत असते. 1985 मध्ये मँचेस्टर विमानतळावर विमानाच्या इंजिनात स्फोट झाल्याने आग लागून 55 प्रवाशांचा मृत्यू झाला.

अनेक प्रवासी सामान्य गेटच्या तुलनेत एक्झिट गेटपासून दुप्पट अंतरावर बसल्याने मृत्युमुखी पडल्याचं या घटनेच्या तपासात शास्त्रज्ञांना आढळून आलं. ग्रीनवीच युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, विमान (Airplane seats) अपघात झाल्यास, जे इमर्जन्सी गेटजवळ बसलेले असतात त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता जास्त असते. कारण, अशा स्थितीत ते लवकर बाहेर पडू शकतात आणि त्यांचे प्राण वाचू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, इमर्जन्सी किंवा आगीच्या प्रसंगी जीव वाचविण्याच्या द़ृष्टीने एक्झिट गेटजवळच्या सीटच्या पाच रांगा प्रवाशांसाठी सर्वोत्तम आहेत.

हेही वाचा :  

शेअर बाजारच्या पडझडीत गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सेबीला सवाल

Back to top button