Air India Buy Aircraft : एअर इंडियाकडून एअर बसची २५० तर अमेरिकेच्या बोईंगकडून २२० विमानांची खरेदी | पुढारी

Air India Buy Aircraft : एअर इंडियाकडून एअर बसची २५० तर अमेरिकेच्या बोईंगकडून २२० विमानांची खरेदी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : फ्रान्सच्या एअर बसकडून एअर इंडियाने (Air India Buy Aircraft) २५० विमाने खरेदी करण्याचा करार केला. या करारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे उपस्थिती नोंदवत दोघांनी एअरबस आणि एअरइंडियाच्या नव्या भागीदारीला शुभेच्छा दिल्या. एअरबसकडून २५० विमाने खरेदी करताच आता बोईंगकडून एअरइंडिया विमाने खरेदी करणार असल्याची माहिती अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी एअर इंडियाकडून 220 बोईंग BA.N विमाने खरेदी करण्याच्या कराराला ऐतिहासिक करार असा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एअर इंडिया व एअरबस भागीदारीच्या लॉन्चिंगला हजेरी लावली. यावेळी टाटा सन्सचे चेअरमन म्हणाले की, आम्ही एअरबससोबत विशेष नाते निर्माण केले आहे. एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्यासाठी आम्ही करारावर स्वाक्षरी केली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. (Air India Buy Aircraft)

दरम्यान, एअर इंडिया बोईंगकडून 220 विमाने खरेदी करणार असल्याचीही बातमी मंगळवारी व्हाईट हाऊसकडून देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या ‘ऐतिहासिक कराराचे’ स्वागत केले आहे. (Air India Buy Aircraft)

बोईंगसोबतचा करार

एअर इंडिया 34 अब्ज डॉलर्समध्ये 220 विमाने खरेदी करणार आहे. याशिवाय आणखी 70 विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. यामुळे एकूण करार 45.9 अब्ज डॉलर्सच्या जवळ जाईल.

एअरबसकडून काय मिळणार

टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडिया एअरबस कंपनीकडून 250 विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये 40 वाइड बॉडी ए-350 विमाने आणि 210 नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे.


अधिक वाचा :

Back to top button