मोठी बातमी : महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या होणार पुन्‍हा सुनावणी | पुढारी

मोठी बातमी : महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या होणार पुन्‍हा सुनावणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षातावर आज सलग दुसर्‍या दिवशी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  शिंदे गटाकडून वकील हरिश साळवे यांनी महत्वपूर्ण युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद केला. यानंतर आज सुनावणी पूर्ण झाली नाही. आता महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी ( दि. १६ ) नियमित सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

आजच्‍या सुनावणी वेळी वादी-प्रतिवादी दोन्हीं बाजूंनी नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ दिला. लंचनंतर जेव्‍हा सुनावणी सुरु झाली तेव्‍हा खंडपीठाने दहा मिनिटांचा ब्रेक घेतला. चर्चा पूर्ण झाल्‍यानंतर खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, हे संपूर्ण प्रकरण सात न्‍यायमूर्तींच्‍या घटनापीठाकडे सोपविण्‍यात यावे, असे  स्‍पष्‍ट केले. लंचनंतर जेव्‍हा सुनावणी सुरु झाली तेव्‍हा खंडपीठाने दहा मिनिटांचा ब्रेक घेतला. यावेळेत खंडपीठ न्‍यायमूर्तीची खटल्‍यासंदर्भात महत्त्‍वपूर्ण चर्चा केली.  यानंतर पुन्‍हा एकदा दोन्‍ही बाजूंनी युक्‍तीवाद झाला. अखेर खंडपीठाने पुढील सुनावणी गुरुवारी होईल. असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. आता गुरुवारच्‍या सुनावणीत सर्वोच्‍च न्‍यायालय हे प्रकरण सात सदस्‍यीय न्‍यायमूर्तींच्‍या खंडपीठाकडे सोपविणार का, याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधले आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे महत्त्‍वपूर्ण निरीक्षण

हरीश साळवे यांच्या युक्तीवादानुसार नबाम रेबिया केस हे आता फक्त अॅकॅडमिक राहिले आहे. यापूर्वी कपिल सिब्बल यांनी देखील कालच्या सुनावणीत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात या नबाम रेबिया केसचा आधार घ्यावा,  असे म्हटले. यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्‍हणाले, “नबाम रेबिया प्रकरण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील प्रकरणाकडे पाहूया आणि या प्रकरणावर भाष्य करू या,”.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, नबाम रेबिया प्रकरणाच्या संदर्भाचा उपयोग दोन्ही बाजूंकडून आपआपल्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रातील प्रकरणाकडे पाहूया, असे ते म्हणाले. मात्र, त्याच वेळी त्यांनी हरिश साळवी यांनी नबाम राबिया केस हे फक्त अॅकॅडमिक राहिले आहे, हा युक्तिवाद खोडून काढला. याशिवाय त्यांनी नीरज कौल यांना नबाम रेबिया केसवर युक्तिवाद करण्यास सांगितले.

पक्षांतर बंदी नव्हे तर पक्षांतर्गत नाराजीचा हा मुद्दा : कौल

हा मुद्दा पक्षांतर्गत बंदीचा नव्हे तर पक्षांतर्गत नाराजीचा हा मुद्दा आहे. तसेच एखाद्या नेत्याला तुम्ही त्याच्या पदावरून हटवू शकत नसाल तर त्यावर पक्षांतर्गत बंदीनुसार कारवाई करणे अयोग्य आहे. असे स्‍पष्‍ट करत शिंदे गटाकडून युक्‍तीवाद करताना नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज होते, असा दावा केला.

हा घटनाक्रम म्हणजे लोकशाहीची हत्या असे केवळ चित्र रंगवण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न होत आहे. पक्षांतर्गत नाराजीचा मुद्द्यावर विचार करावा. बहुमत नसलेल्या ठाकरे गटाने व्हीप जारी केला. ज्यांच्याकडे विश्वास नव्हता त्यांनी व्हीप जारी केला. आम्हीच खरी शिवसेना, आम्ही शिवसेनेतच आहोत मात्र आम्ही नेत्यावर नाराज आहे, मग ते आमचे नेते कसे?ज्या नेत्यावर आमदारांची नाराजी तो नेता मुख्यमंत्री कसा?, असा सवालही कौल यांनी या वेळी केला.

हेही वाचा : 

Back to top button