पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात लाखो लोकांचा बळी घेणार्या कोरोना (Covid 19) महामारीला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे; परंतु कोरोनाच्या सुरूवातीच्या टप्प्यात मास्क हाच संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा होता. परंतु, हा दावा फोल ठरल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
फॉक्स न्यूजनुसार, सीडीसीचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी सप्टेंबर २०२०मध्ये सांगितले होते की, कोरोना संसर्ग (Covid 19) रोखण्यासाठी फेस मास्क हे आमच्याकडील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्यानंतर लवकरच जगभरात फेस मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. दरम्यान, जगभरातील नामांकित विद्यापीठांतील १२ संशोधकांच्या नेतृत्वाखालील मास्कबाबत संशोधन करण्यात आले. या संशोधनातून कोविड-19 चा प्रसार रोखण्यात मास्क कुचकामी ठरल्याचे समोर आले आहे.
कोक्रेन लायब्ररी (Cochrane Library) द्वारे प्रकाशित केलेल्या संशोधनात 'शारीरिक प्रतिबंध' म्हणजे फेस मास्क घालणे आणि हात धुणे, यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखला किंवा कमी झाला की नाही, हे तपासण्यासाठी ७८ नियंत्रित चाचण्या करण्यात आल्या. संशोधकांनी मास्क घालणे आणि मास्क न घालण्यामुळे कोरोना संसर्गाची काय परिस्थिती होती. या संदर्भात संशोधन केले. यात मास्क घातल्याने संसर्ग रोखण्यात फारसा फरक पडला नसल्याचे समोर आले.
या संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की, वैद्यकीय किंवा सर्जिकल मास्क आणि एन 95 या मास्कमध्ये कोणताही फरक आढळून आला नाही. अभ्यासात असे आढळून आले की, एन 95 किंवा पी 2 रेस्पिरेटर घातल्याने फ्लूचे निदान किती लोकांमध्ये झाले आहे. काही लोक फ्लू सारख्या आजाराने आजारी पडले किंवा त्यांना श्वसनाचा आजार झाल्याचे आढळून आले. या अभ्यासासाठी संशोधकांनी २००९ मधील H1N1 फ्लू महामारी, नॉन-पँडेमिक फ्लू सीझन, २०१६ पर्यंतचा फ्लू सीझन आणि कोविड-19 महामारी या दरम्यान डेटा गोळा केला होता.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या संशोधनाचा निष्कर्ष निश्चित मानला जाऊ शकत नाही. कारण या संशोधनासाठी केलेला काही अभ्यास कोविड संसर्गाच्या आधी केला होता. जेव्हा विषाणूचा प्रसार तितका वेगवान नव्हता. यावेळी अनेकांनी प्रामाणिकपणे मास्कचा वापर केला नव्हता. इतर संशोधनातून असे समोर आले आहे की, मास्कपेक्षा घरात राहिल्याने कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या रोखण्यात मदत झाली.
हेही वाचा :