Economic Survey 2023 : 'कोरोना काळातील 'आर्थिक हानी' भरून निघाली' - सीइए नागेश्वरन | पुढारी

Economic Survey 2023 : 'कोरोना काळातील 'आर्थिक हानी' भरून निघाली' - सीइए नागेश्वरन

पुढारी ऑनलाइन डेस्क : कोरोना महामारीच्या काळात झालेले आर्थिक नुकसान-हानी पूर्ण भरून निघाली आहे. सध्या नॉन-बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्राचे वार्षिक ताळेबंद पत्रक सकारात्मक आणि चांगले दिसत आहे. त्यामुळे आम्हाला आता साथीच्या आजारात झालेल्या नुकसानीच्या पुनर्प्राप्तीबद्दल बोलण्याची गरज नाही. आम्हाला पुढच्या टप्प्याकडे पाहावे लागणार आहे, असे सीईए (मुख्य आर्थिक सल्लागार) व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. Economic Survey 2023

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेच्या पटलावर आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालाच्या विश्लेषणावर सीईए नागेश्वरन यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सीईए नागेश्वरन यांनी म्हटले आहे, गेल्या आठ वर्षातील सुधारणा म्हणजे या दशकात भारताची कामगिरी चांगली होईल. तसेच भारताची अर्थव्यवस्था या दशकाच्या उर्वरित काळात अधिक चांगली कामगिरी करण्यास तयार आहे. Economic Survey 2023

नागेश्वरम पुढे म्हणाले, अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2023 मध्ये 6.8 2024 मध्ये 6.1 आणि 2025 मध्ये 6.8 टक्के इतका आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षीचे आमचे आर्थिक सर्वेक्षण हे त्याचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. बँकिंग, नॉन-बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये दीर्घ काळानंतर चांगले ताळेबंद दर्शवत आहेत. त्यामुळे आपल्याला आता महामारीच्या काळात झालेल्या नुकसान किंवा हानी भरून काढण्याबाबत बोलण्याची गरज नाही. ही हानी भरून निघाली आहे. आपण जवळपास सर्वच पुन्हा प्राप्त केले आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्याकडे पाहायचे आहे. Economic Survey 2023

हे ही वाचा :

State Cabinet Decision : महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मोठी बातमी : विशाखापट्टणम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी ; मुख्यमंत्री रेड्डी यांची घोषणा

Back to top button