पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांची पत्नी क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांचे या आठवड्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, असे बकिंघम पॅलेसने सोमवारी (दि.१३) सांगितले.
कॅमिला यांना गेल्या वर्षी कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. तेव्हा देखील त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाली होती. बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटले आहे की, "सर्दीची लक्षणे दिसू लागल्यानंतर कॅमिला यांची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली." त्यांचे या आठवड्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.