Crime : धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला; त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न

Crime : धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला; त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका तरुणाने आपल्या  लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून खून केली. त्यानंतर तिचा  मृतदेह फ्रिजध्ये ठेवला. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे त्याने हत्येच्या दिवशीच दुसऱ्या मुलीशी लग्न केले. आरोपीचे नाव साहिल गेहलोत (२४) असे असून, मृत तरुणीचे नाव निक्की यादव असे आहे. ते काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. वाचा सविस्तर बातमी. (Crime)

पोलिसांच्या माहितीनूसार, आरोपी साहिल  (२४) आणि मृत युवती निक्की यादव  (२४) काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.  मृत युवती हरियाणातील झज्जरची रहिवासी आहे. निक्कीने साहिलच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. सततच्या तगाद्यातून त्याने संतापातून हे कृत्य  केल्याची कबुली पोलिसांनी दिली. घटना अशी की, साहिलने निक्कीचा 9 आणि 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री काश्मिरी गेट बस अड्ड्याजवळ मोटार कारमध्ये डेटा केबलच्या सहाय्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मित्राऊ गावातील एका धाब्यातील फ्रीजमध्ये ठेवला. आणि  त्याच दिवशी त्याने दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले.

Crime : अशी झाली ओळख 

फेब्रुवारी २०१८ मध्ये साहिलने ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया कॉलेजमधील डी फार्मामध्ये प्रवेश घेतला आणि निक्कीनेही त्याच कॉलेजमध्ये बीए (इंग्रजी ऑनर्स) मध्ये प्रवेश घेतला होता. तिथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर तिथे ते भेटायचे.  त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.  त्यानंतर दोघेही ग्रेटर नोएडा येथे भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले. ते एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांनी मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, डेहराडून इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यानंतर "कोविड लॉकडाऊन दरम्यान, ते आपापल्या घरी परतले. पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर ते पुन्हा द्वारका परिसरात भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले.

घरच्यांचा दबाब

साहिलने आपल्या घरी निकीशी असलेल्या नातेसंबंधाची माहिती आपल्या घरच्यांना दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याच्यावर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यानंतर साहीलचे लग्न ठरलेय याची माहिती त्याने निकीला दिली. त्यानंतर दोघांच्यात वाद झाला. त्या दरम्यान त्याने त्याच्या कारमध्ये ठेवलेल्या मोबाईल फोनच्या डेटा केबलच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो त्याच्या मालकीच्या ढाब्यावर गेला आणि तिचा मृतदेह फ्रिज. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना १० फेब्रुवारी रोजी या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर फरार आरोपीच्या शोधात पोलिस मित्राव गावात पोहोचली. त्यानंतर साहिलला राष्ट्रीय राजधानीतील कैर गाव क्रॉसिंगवरून पोलिसांच्या पथकाने पकडले. प्राथमिक चौकशीत त्याने संघाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news