Crime : युवतीची हत्या करून मृतदेह लपविला धाब्यातील फ्रीजमध्ये ; दिल्लीतील धक्कादायक घटना | पुढारी

Crime : युवतीची हत्या करून मृतदेह लपविला धाब्यातील फ्रीजमध्ये ; दिल्लीतील धक्कादायक घटना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : युवतीची हत्या करून तिचा मृतदेह धाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. काश्मिरी गेट बस अड्ड्याजवळ मोटार कारमध्ये गळा दाबून युवतीची हत्या करण्यात आली, त्यानंतर मित्राऊ गावातील एका धाब्याच्या फ्रीजमध्ये तिचा मृतदेह आरोपी साहिल गेहलोत याने लपवून ठेवला होता.
आरोपी साहिल आणि मृत युवती हे रिलेशनशिपमध्ये होते. युवतीने साहिलच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यातूनच संतापून त्याने युवतीची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंग यांनी सांगितले. मृत युवती ही हरियाणातील झज्जरची रहिवासी होती.
हेही वाचा

Back to top button