“फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य” : संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका | पुढारी

"फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य" : संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका

पुढारी ऑनलाईनडेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचाच हात असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य असल्याची टीका केली आहे. “आठ आश्चर्य जगात आहेत, दोन आश्चर्य दिल्लीत आणि त्यातील दहावं आश्चर्य़ फडणवीस,” असे त्यांनी म्हटलं आहे. आज (दि.१४) माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी खा. राऊत म्हणाले की, “फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नाहीत. उद्या ते असे बोलतील की, ४०-५० आमदारांचा सुरत, गुवाहटी, गोवा आणि मुंबईत जो शपथ विधी झाला तो शरद पवारांमुळे झाला. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांना अजुनही दचकून जाग येते. त्याची त्यांनी कारणे शोधून उपचार घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील वातावर मिंथे आणि फडणवीसांच्या विरोधातील आहे त्याचा हा परिणाम असेल. विधानपरिषद निवडणुकांतील पराभवामुळे आणि पोटनिवडणुकीत दारून पराभव दिसत असल्याने ते अशी वक्तव्य करतात. अजित पवार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते म्हणून वातावरण तयार करत भाजपला आव्हान देत आहेत. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी कितीही विधाने केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही,” असे राऊत यांनी म्हटले आहे.

फडणवीस नेमके काय म्हणाले?

पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रचार सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्या वेळी निकालानंतर नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली, की ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत निघून गेले. दुसरा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना कमी दोष देईन. कारण, त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत हे लक्षात आले आणि राष्ट्रवादीकडून आम्हाला स्थिर सरकार तयार करूया म्हणून ऑफर आली. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे सगळ्यांनी पाहिले आहे. त्या ठिकाणी एक प्रकारचा विश्वासघात झाला.

अजित पवार सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती हे त्यांना सांगावे लागेल. सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्याकडे (राष्ट्रवादीत) काय स्ट्रॅटेजी बदलल्या हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितले तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असा इशराही फडणवीस यांनी देऊन ठेवला.

Back to top button