“LTTEचा म्होरक्या प्रभाकरन जीवंत, लवकरच लोकांसमोर येणार” : तामिळ नेत्याच्याच्या दाव्याने खळबळ

“LTTEचा म्होरक्या प्रभाकरन जीवंत, लवकरच लोकांसमोर येणार” : तामिळ नेत्याच्याच्या दाव्याने खळबळ

पुढारी ऑनलाईन : LTTE या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या प्रभाकरन जीवंत असून तो लवकरच जनतेसमोर येणार आहे, असा दावा तामिळनाडूतील नेते पाझहा नेडुमारन यांनी केला आहे. प्रभाकरनला ठार मारल्याचा दावा श्रीलंकेने १८ मे २००९ला केला होता.

प्रभाकरनने लिबरेनश टायर्गस ऑफ तामिळ इलाम (LTTE) या संघटनेटी स्थापना करत श्रीलंकेत तामिळ भाषिकांसाठी स्वतंत्र देशाची मोहीम सुरू केली होती. यातून श्रीलंकेत फार मोठा हिंसाचार आणि दहशतवादाचे सत्र सुरू झाले होते. श्रीलंकेच्या लष्कराने गेल्या दशकात या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली. यात १८ मे २००९ला मुल्लिवैकल येथे झालेल्या महत्त्वाच्या मोहिमेत प्रभाकरनला ठार मारण्यात आले, असा दावा श्रीलंकेच्या लष्कराने केला होता. यानंतर प्रभाकरन याच्या मृतदेहाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणवर शेअर करण्यात आले होते. काहींनी या फोटो आणि व्हिडिओंवर शंकाही व्यक्त केली होती. त्या वेळी प्रभाकरनचे वय ५४ होते.

नेडुमारन जागतिक तामिळ संघाचे अध्यक्ष आहेत. तंजावरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "प्रभाकरन जीवंत आहे, हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. तामिळ इलामबद्दल ते लवकरच भाष्य करतील."

भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत प्रभाकरन मूख्य आरोपी होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर भारताने LTTEवर बंदी घातली आणि ही संघटनेला दहशतवादी घोषित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news