दहशतवाद, नक्षलवाद नियंत्रणात आणण्यात यश : अमित शहा | पुढारी

दहशतवाद, नक्षलवाद नियंत्रणात आणण्यात यश : अमित शहा

हैदराबाद; वृत्तसंस्था :  केंद्रातील भाजप सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्येकडील बंडखोरी आणि दहशतवादासह नक्षलवादावरही नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी येथे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) प्रशिक्षणार्थींच्या 74 व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात संबोधित करताना शहा बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्य तपास यंत्रणांशी देशातील पोलिस दल प्रभावी समन्वय साधत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) विरोधात एकाच दिवसात देशभरात पोलिस दलांनी यशस्वी मोहीम राबवली. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मिरात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ईशान्येतील बंडखोर संघटनांसोबत शांतता करारानंतर आठ हजारांहून अधिक बंडखोरांना मुख्य प्रवाहात आणले गेले. ईशान्येत राज्यांतील सीमा विवाद सोडवून विकासात्मक कामांनी शांतता प्रस्थापित होऊन एक नवीन युग सुरू झाले आहे.

Back to top button