Sanjay Raut : निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय 'त्यांच्या' खिशात आहे काय? - संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय 'त्यांच्या' खिशात आहे काय? - संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सूचक विधाने केली. त्यावर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी, “निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय?” असा सवाल करत खोचक ट्विट केले आहे. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut)

ही ब्रेकिंग न्यूज टाका – नारायण राणे

संपूर्ण राज्याचं लक्ष सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे लागलं आहे. सत्तासंघर्षाचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यात शनिवारी (दि.११) एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी ते बोलत असताना एक सूचक विधान केले. ते म्हणाले, ”ही ब्रेकिंग न्यूज टाका,“ मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह त्यांच्या हातातून जाणार आहे. ते चिन्ह ४० आमदारांचा पाठिंबा असलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

Sanjay Raut : आपल्या बाजूने निकाल येईल – देवेंद्र फडणवीस

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक (दि.११) येथे झाली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले,”आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की,” मी ठासून सांगतो, सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल.

नो कमेंटस् – संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोघांच्या वक्तव्यावर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय ‘यांच्या’ खिशात आहे काय?” देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे निकाल जाहीर केला सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्याच बाजूने लागेल. आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांना ब्रेकींग न्यूज देत सांगतात. शिवसेनेचे चिन्ह जाईल ते शिंदे यांनाच मिळेल. No comments!”
आता संजय राऊत यांच्या खोचक ट्विट नंतर फडणवीस आणि राणे यांच्या प्रतिक्रिया काय असतील यावर राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button