अल-कायदाच्या संपर्कात आला सॉफ्टवेअर इंजिनिअर! ISIS मध्ये सामील होण्यासाठी इराण अफगाणिस्तानला जाण्याची होती योजना

अल-कायदाच्या संपर्कात आला सॉफ्टवेअर इंजिनिअर! ISIS मध्ये सामील होण्यासाठी इराण अफगाणिस्तानला जाण्याची होती योजना

पुढारी ऑनलाईन डेस्क : एनआयएने शुक्रवारी बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला दहशतवादी कारवाया आणि अल-कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली. मोहम्मद आरिफ असे या इंजिनिअरचे नाव असून तो अलिगढ येथील रहिवाशी आहे. यासह एनआयएने महाराष्ट्रातील पालघरमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरिफने ISIS मध्ये सामील होण्यासाठी इराण आणि अफगाणिस्तानला जाण्याची योजना आखली होती. मार्चमध्ये तो तेथे जाणार होता, असे एनआयएचा दावा आहे.

आरिफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढचा असून चार वर्षांपूर्वी तो बंगळुरूमध्ये स्थायिक झाला होता. थानिसांद्र येथील घरी तो पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत तो काम करायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो दहशतवाद आणि जातीय द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या सोशल मीडिया ग्रुपवर सक्रिय होता. त्याचा अल कायदाशी दोन वर्षांपासून संबंध होता. आतापर्यंत तो कोणत्याही आतंकवादी घटनेत सामील झाला नाही, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, मोहम्मद आरिफला पोलिसांनी बेंगळुरूमधील थानिसांद्रा येथून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशात जाण्याची आखली होती योजना

सूत्रांनी सांगितले की, आरिफ टेलिग्राम आणि डार्कनेटवर सक्रिय होता आणि दहशतवादी संघटनेचे संदेश पसरवत होता. मार्चमध्ये तो इराकमार्गे सीरियात पोहोचण्याच्या तयारीत होता. सीरियाला जाता आले नाही तर अफगाणिस्तानात पोहोचण्याचाही त्याचा विचार होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news