Governors appointed: १३ राज्यांचे राज्यपाल बदलले | पुढारी

Governors appointed: १३ राज्यांचे राज्यपाल बदलले

पुढारी ऑनलाईन : देशभरातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली असून आधीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासह काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचचबरोबर काही नवीन राज्यपालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आतापर्यंत बीडी मिश्रा हे राज्यपाल होते, जे भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर होते.

‘हे’ आहेत राज्यांचे नवे राज्यपाल…

सिक्कीम : लक्ष्मण प्रसाद आचार्य

झारखंड : सी.पी. राधाकृष्णन

हिमाचल प्रदेश : शिव प्रताप शुक्ला

आसाम: गुलाबचंद कटारिया

आंध्र प्रदेश : माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर

छत्तीसगड : आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती

मणिपूर : छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती

नागालँड : मणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

मेघालय : बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती

बिहार : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर नियुक्ती

महाराष्ट्र : झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती

हेही वाचा:

Back to top button