पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कस्तान आणि सीरियातील सोमवारच्या (दि.६) विनाशकारी भूकंपाने अख्या जगाला हादरवून टाकले आहे. जिवीत आणि वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आजच्या ( दि.११ सकाळी १० पर्यंत) माहितीनुसार मृतांची संख्या किमान २४,००० वर पोहोचली आहे. भूकंपातील बळींची संख्या आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला होता. हा भूकंप होण्यापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे धक्के बसतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. वाचा सविस्तर बातमी. (Earthquake alert)
तुर्की आणि सीरियाच्या भूकंपानंतर डच संशोधकांचं एक ट्विट व्हायरलं होत आहे. ६ फेब्रुवारी रोजी भूकंप झाल्यानंतर संशोधकांनी ३ फेब्रुवारी रोजी ट्विट केलेलं व्हायरलं होत आहे. यामध्ये त्यांनी म्हंटलं होतं की, ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप जॉर्डन, सीरिया, लेबनॉन, तुर्की या देशात होईल. त्यानंतर होगरबीटस यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. हा भूकंप होण्यापूर्वी डच संशोधक फ्रॅंक होंगरबीटस यांनी अंदाज व्यक्त केला होता की, तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे धक्के बसतील. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, वातावरणातील बदल पाहता भारतालाही भूकंपाचा धोका आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप होईल आणि त्याचे धक्के पाकिस्तानसह भारतातही बसतील.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर (Indian Institute Of Technology–Ropar (IIT–R) मधील संशोधकांनी नवीन आणि जुन्या इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते भारतातील इमारती कॉंक्रीट आणि पॉलिमर फायबर साहित्याने बांधलेल्या असल्याने त्या भूकंप प्रतिरोधक आहेत.
तुर्की-सिरियात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर एक भारतीयही बेपत्ता आहे. पेशाने इंजिनिअर असलेले विजय कुमार (३६, उत्तराखंड) हे बंगळुरू मधील एका कंपनीत कार्यरत आहेत. ते ऑफिस टूरवर १ महिन्यासाठी गेले आहेत. २३ जानेवारी रोजी ते तुर्कीत पोहोचले. त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी एकदाच संपर्क झाला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदूही तुर्कीत होता. येथील टेक्टोनिक प्लेटस् भूकंपानंतर १० फूट वर (३ मीटर) सरकल्या आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुर्की हा देश अॅनाटोलियन, युरेशियन आणि अरेबियन या ३ टेक्टोनिक प्लेटस्च्या मध्ये वसलेला आहे. अॅनाटोलियन आणि अरेबियन प्लेटस् परस्परांपासून २२५ कि.मी. अंतर सरकल्या आहेत. परिणामी, तुर्की हा देश आजवरच्या भौगोलिक स्थानापासून १० फूट सरकला आहे.
हेही वाचा