नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधी मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मौलाना सुहैब कासमी यांनी मोठा दावा केला आहे. पीएफआय कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणामधील शिक्षित मुस्लिम शिक्षकांना लक्ष करीत असल्याचा दावा कासमी यांनी केला आहे. संघटनेला शाळा तसेच मदरसातील युवकांची दिशाभूल करायची आहे, असा दावा देखील त्यांनी केला.