सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. ८) सुनावणी होणार असली तरी न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठात पुन्हा एकदा कर्नाटकाच्या न्यायमूर्तींचा समावेश असल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सीमाप्रश्नी गेल्या अडीच महिन्यांपासून सुनावणी पुढे ढकलत आहे. तारीख लिस्टेड असली तरी खंडपीठातील न्यायमूर्ती दुसऱ्या खटल्यात व्यग्र असल्यामुळे प्रत्यक्षात सुनावणी होत नव्हती. ३० नोव्हेंबर रोजीच्या सुनावणीआधी खंडपीठातील कर्नाटकाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी माघार घेतली. त्यामुळे नवे खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायमूर्ती एम. के. जोसेफ, न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांचा समावेश होता. आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायमूर्ती के. एल. जोसेफ, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

 

Back to top button