पैठण ; पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरण पाणीपातळी ९५ टक्क्यांपर्यंत पोहचली असून धरण तुडुंब भरले आहे. धरणात सध्या वरील भागातून १ लाख ५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात ९ हजार ७३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे अर्धा फुटाने उघडले आहेत. धरणाचे पाणी पूजन व दरवाजे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थीतीत करण्यात आले.
वरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडी धरण क्षेत्र भरत आहे . दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.
यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्यास जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडु नये यासाठी खबरदारी म्हणून आज (दि. २९) ११ वाजता जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधिक्षक अभियंता संबिरवार, एसडीएम स्वप्नील मोरे तहसीलदार चंद्रकांत शेळके, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, मुख्यधिकारी संतोष आगळे, सह आदीच्या उपस्थीतीतित जायकवाडी धरणाची १८ दरवाजे उघडण्यात आले.