Adani Raw : हिंडनबर्ग वादानंतर अदानी समुहाची पुन्हा मोठी घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय | पुढारी

Adani Raw : हिंडनबर्ग वादानंतर अदानी समुहाची पुन्हा मोठी घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर अदानी  समूहाने मोठी घोषणा केली आहे. सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. अदानी समूहाने सोमवारी सांगितले की प्रवर्तक कर्जदात्यांकडे तारण ठेवलेल्या समभागांची मुदतपूर्व पूर्तता करण्यासाठी १११.४ कोटी डॉलर इतकी रक्कम जमा करेल. या शेअर्सची परिपक्वता सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. समूहाने सांगितले की हे तारण असलेले शेअर्स अदानी पोर्ट्स, स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे आहेत. कंपनीने उचलेले हे पाऊल शेअर्स तारण ठेवून वित्तपुरवठा व्यवस्थेच्या सर्व प्रकरणांमध्ये प्रवर्तकांच्या प्रीपेमेंटच्या आश्वासनाशी सुसंगत असल्याचे अदानी समुहाकडून सांगण्यात आले आहे. (Adani Raw)

अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाविरुद्ध कथित फसवणूक आणि शेअर्समध्ये फेरफार केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे समूहाकडून करण्यात आलेले हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या अहवालानंतर समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. (Adani Raw)

अदानी समुहाने दिलेल्या निवेदनानुसार, बाजारातील अलीकडील अस्थिरता आणि सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सवर घेतलेले कर्ज कमी करण्यासाठी प्रवर्तकांची वचनबद्धता लक्षात घेता, आम्हाला हे कळविण्यास आनंद होत आहे की प्रवर्तकांनी मुदतीपूर्वी 111.4 कोटी डॉलर्स इतकी रक्कम परत केली जाईल. शिवाय या शेअर्सची परिपक्वता कालावधी सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. (Adani Raw)

111.4 कोटी डॉलर्सचे मुदतपूर्व पेमेंटमुळे अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रांचे 16.827 कोटी शेअर्स परत मिळतील, जे प्रवर्तकांच्या 12 टक्के समभागांच्या समतुल्य आहेत. अदानी ग्रीनच्या बाबतीत 2.756 कोटी शेअर्स म्हणजेच प्रवर्तकांचे तीन टक्के शेअर्स होतील. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनचे 1.177 कोटी शेअर परत येतील जे प्रवर्तकांच्या 1.4 टक्क्यांच्या समतुल्य आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की प्रवर्तकांनी वित्तीय संस्थांना त्यांच्या कर्जाच्या पेमेंटची खात्री देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीच्या विश्वासर्हतेला आणखी मजबुती येईल.

अधिक वाचा :

Back to top button