‘अदानी’ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन | पुढारी

'अदानी' प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहातील गैरकारभार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आज (दि. ६ ) सकाळी ११ वाजता येथील पाटणी चौक परिसरातील स्टेट बँकेसमोर झालेल्या काँग्रेसच्‍या वतीने धरणे आंदोलन करण्‍यात आले.

 आंदोलनावेळी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

आंदोलनाचे नेतृत्व कँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके, शहराध्यक्ष शंकर वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे, शैलेश सारस्कर,सागर गोरे, गणेश मोरे, कुंडलिकराव शेगोकार, तसलीम भाई नगरसेवक, तन्मणे, सदीप खराटे, गोपाल कुटे, पांडुरंग वानखेडे,प्रकाश वायभासे, राजूभाऊ घोडिवाले, देवडे मामा, संजू मुरमुरे,रोहित दांदडे,प्रसाद गांजरे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.

हेही वाचा

Back to top button