Virendra Sehwag on Adani : अदानी प्रकरणात वीरेंद्र सेहवागची उडी; म्हणाला… | पुढारी

Virendra Sehwag on Adani : अदानी प्रकरणात वीरेंद्र सेहवागची उडी; म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अदानी-हिंडेनबर्ग वादात आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. सेहवागने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये सेहवाग म्हणाला, सध्या सुरू असलेले हे प्रकरण ठरवून केलेले षडयंत्र आहे. गोऱ्यांना भारतीयांची प्रगती बघवली जात नाही. कितीही प्रयत्न केले तरी, भारत यातून मजबूतीने बाहेर पडेल. (Virendra Sehwag on Adani)

वीरेंद्र सेहवाग त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्च्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर व्यक्त होत असतो. त्याने २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबतही आपली भूमिका मांडली होती. केंद्र सरकारच्या ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने चांगले पाऊल उचलले असल्याचे सेहवाग म्हणाला होता. (Virendra Sehwag on Adani)

दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला होता. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे., असे गंभीर आरोप हिंडेनबर्ग फर्मकडून करण्यात आले होते. ‘केंद्र सरकार घाबरले’; राहुल गांधींनी अदानींवर चर्चा करण्याचे दिले आव्हान

https://t.co/39E7ITmXfe #PudhariOnline #AdaniGroups #RahulGandhi #HindenburgExposed #HindenburgResearch #RahulGandhChallenges

हेही वाचंलत का?

Back to top button