‘तुझं करिअर उद्‍ध्‍वस्‍त करेन…’ : शिखर धवनला पत्‍नीने दिली धमकी! | पुढारी

'तुझं करिअर उद्‍ध्‍वस्‍त करेन...' : शिखर धवनला पत्‍नीने दिली धमकी!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा स्‍टार फलंदाज शिखर धवन यांना आज दिल्‍ली न्‍यायालयाने मोठा दिलासा दिला. शिखरची बदनामी होईल, अशी विधान करु नका, असा आदेश दिल्‍लीमधील पटियाला न्‍यायालयाने शिखरची पत्‍नी आयशा मुखर्जीला दिला आहे. ( Shikhar and Aesha ) दरम्‍यान, शिखर आणि आयशा यांच्‍या घटस्‍फोट खटला सुरु आहे. नुकतेच शिखरने पटियाला न्‍यायालयात अर्ज दाखल केला होता. यामध्‍ये म्‍हटलं होते की, “पत्‍नी आयशा हिने माझी प्रतिमा आणि करिअर उद्‍ध्‍वस्‍त करण्याची धमकी दिली आहे. तिच्‍याकडून माझी प्रतिमा मलीन केली जात आहे.”

आयशा मुखर्जी ही मूळची ऑस्‍ट्रेलियाची नागरिक आहे. या दोघांनी २०१२ मध्‍ये विवाह केला. आयशाचा हा दुसरा विवाह होता. पहिल्‍या विवाहातून तिला दोन मुली आहेत. धवन बरोबर विवाह केल्‍यानंतर आयशाला २०१४ मध्‍ये मुलगा झाला. मात्र काही वर्षांनी दोघांमधील मतभेद वाढले. २०२० पासून शिखर आणि आयशा हे वेगळे राहत आहेत. आयशा सध्‍या मुली व मुलासह ऑस्‍ट्रेलियामध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत.

Shikhar and Aesha : आयेशाला न्‍यायालयाने दिले आदेश

शिखर धवन याने केलेल्‍या अर्जाची पटियाल हाउस न्‍यायालयाचे न्‍यायाधीश हरीश कुमार यांनी दखल घेतली आहे,
आयशा हिने सोशल मीडिया व प्रिंट मीडिया, मित्र व नातेवाईक यांच्‍याशी बोलताना शिखर धवन याची बदनामी होईल, असे विधान करु नये. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला आपला सन्‍मान हा प्रिय असतो. समाजात स्‍थान मिळविण्‍यासाठी परिश्रम करावे लागतात. बदनामीमुळे मोठे नुकसान होते, असे त्‍यांनी आपल्‍या आदेशात म्‍हटले आहे. तसेच मुखर्जी यांच्याकडे धवनच्या विरोधात वस्‍तुनिष्‍ठ तक्रारी असतील, तर त्यांना संबंधित अधिकार्‍याकडे नोंदवाव्‍यात.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button