‘या’ राज्यातील सर्वच जिल्ह्यांत उच्च न्यायालयाचे व्हर्चुअल खंडपीठ; न्यायव्यवस्था झाली हायटेक | Virtual Branches of High Court | पुढारी

'या' राज्यातील सर्वच जिल्ह्यांत उच्च न्यायालयाचे व्हर्चुअल खंडपीठ; न्यायव्यवस्था झाली हायटेक | Virtual Branches of High Court

खटलाही ऑनलाईन दाखल करता येणार | Virtual Branches of High Court

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशा राज्यात उच्च न्यायालयाची १० व्हर्चुअल खंडपीठ स्थापन झाली आहेत. व्हर्चुअल खंडपीठ स्थापन करणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी या व्हर्चुअल खंडपीठांचे उद्घाटन केले. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ओडिशातील सर्व जिल्ह्यांत व्हर्चुअल खंडपीठांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती चंद्रचुड यांनी दिली आहे. (Virtual Branches of High Court)

“प्रत्येक जिल्ह्यात उच्च न्यायालय असलेले ओडिशा हे पहिले राज्य ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना नागरिकांना आता उच्च न्यायालयातील कामकाजासाठी अन्यत्र जाण्याची गरज नाही. राज्यातील सर्वच वकिलांनाही याचा लाभ होणार आहे,” असे चंद्रचुड म्हणाले.
ओडिशा राज्याचे मुख्य न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. “व्हर्चुअल खंडपीठांचा परिणाम सर्व जिल्ह्यांत दिसेल. पक्षकारांना खटलेही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. त्यामुळे पक्षकार आणि वकील या सर्वांनाच हे फायदेशीर ठरणार आहे.”

व्हर्चुअल खंडपीठात खटला कसा दाखल करावा, त्याचे लिस्टिंग कसे होईल, या सगळ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत. “खटला दाखल करण्यासाठी वकिलांना कटकला जावे लागत असे, आता ते त्यांच्या जिल्ह्यातूनच खटला दाखल करू शकतील,” असे मुरलीधर म्हणाले.

हेही वाचा

Back to top button