पुढारी ऑनलाइन डेस्क : अवकाळी पावसावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे स्पष्ट केले.(Crop loss)
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
त्यानंतर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. यापूर्वीही नियमांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत केली आहे, असे म्हणत आताही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. नांदेडच्या कलेक्टरशी पंचनाम्याबाबत मी स्वतः चर्चा केली आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. हे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :