पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवर कोणत्याही राज्यात झाली नाही. एवढी गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून कोकणात होणार होती. मात्र, लोकांना प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देण्यात आली. तुमचे आंबे पिकणार नाहीत, तसेच मच्छीमारी बंद पडेल, अशा प्रकारची माहिती देत लोकांची दिशाभूल करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने १ लाखांचा रोजगार गमावला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते सिंधुदुर्गातील जाहीर सभेत बोलत होते.
सिंधुदुर्गात चिपी विमानतळ झाले याचे सर्व श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आहे. ज्यांनी विमानतळासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही, त्यांनी विमातळाचे उद्घाटन केले. उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी एकही योजना आणली नाही, हेच त्यांचे कोकणावरचे प्रेम आहे. आम्ही कोकणात मूलभूत सोईसुविधा आणि रस्त्यांसाठी निधी दिला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सदृढ होणार आहे. सिंधुदुर्गातील समुद्र किनारे गोव्यातील किनाऱ्यापेंक्षा जास्त चांगले आहेत. त्यामुळे राज्य सरकार विदेशी पर्यटक कोकणात कसे येतील याकडे लक्ष देईल. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी, कोकणात फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.