Karnataka Elections : धर्मेंद्र प्रधान भाजपचे राज्‍य प्रभारी, अण्‍णामलाई सह-प्रभारी | पुढारी

Karnataka Elections : धर्मेंद्र प्रधान भाजपचे राज्‍य प्रभारी, अण्‍णामलाई सह-प्रभारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्‍य  प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्‍यक्ष के. अन्‍नामलाई यांची सह-प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याचेही पक्षाच्‍या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ( Karnataka Elections )

कर्नाटक विधानसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्‍यात होणार आहेत. यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्‍यात सत्ता अबाधित ठेवण्‍याची रणनीती आखताना कर्नाटक भाजपमध्‍ये पक्षांतर्गत मतभेद सोडविण्‍याचे आव्‍हान धर्मेंद्र प्रधान त्‍यांच्‍यावर असेल. प्रधान यांनी यापूर्वीही अनेक राज्‍यांच्‍या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. ( Karnataka Elections )

भाजपने सिक्‍कीममध्‍येही केले फेरबदल

भाजपने सिक्‍कीममध्‍येही फेरबदल केले आहेत. राज्‍याच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी डी.आर. थापा यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तर एन. के. सुब्‍बा यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्‍यात आली आहे. डी.टी. लेपचा यांना राष्‍ट्रीय कार्यकारणीत विशेषा सदस्‍य म्‍हणून नियुक्‍त केले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button