पाकिस्तानची ‘Wikipedia’ वर मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे आणली वेबसाईटवर बंदी | पुढारी

पाकिस्तानची 'Wikipedia' वर मोठी कारवाई; 'या' कारणामुळे आणली वेबसाईटवर बंदी

पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानने ‘विकिपीडिया’वर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानने देशातील ‘Wikipedia’ ची सर्विस बंद केली आहे. ‘Wikipedia’ या माहिती प्लॅटफॉर्मवरून धर्मासंबंधी निंदनीय सामग्री किंवा माहिती काढून न टाकल्याने पाकिस्तानने ही कारवाई केली आहे.

‘विकिपीडिया’वरील ही धर्मासंबंधी निंदनीय सामग्री किंवा माहिती काढून न टाकल्यास ‘विकिपीडिया’ बंद करण्याचा इशारा पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने ‘Wikipedia’ ला दिला होता. त्यानंतर पाकिस्तानातील दूरसंचार प्राधिकरणाकडून त्याच्या ट्विट अकाऊंटवरून विकिपीडिया काढून टाकण्याचा म्हणजेच बंद करण्याची माहिती दिली आहे.

यासंबंधी पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, Wikipedia या प्लॅटफॉर्मने अधार्मिक, निंदनीय सामग्री काढून टाकली नाही, सूचना देऊनही अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी विकीपीडाला इशारा देत, १ फेब्रुवारी रोजी विकीपीडियाची सेवा ४८ तासांसाठी पुर्ववत करण्यात आली होती. तरी देखील विकीपीडीयाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ४८ तासानंतर पुन्हा Wikipedia चा प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आल्याची माहिती ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या देशातही ‘Wikipedia’ वर बंदी

विशेष म्हणजे विकिपीडियावर ‘सेन्सॉरशिप ऑफ विकिपीडिया’ वर एक लेख आहे. ज्यामध्ये नमूद केले आहे की, चीन, इराण, म्यानमार, रशिया, सौदी अरेबिया, सीरिया, ट्युनिशिया, तुर्कस्तान, उझबेकिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांमध्येही अशाच प्रकारे ‘विकिपीडिया बंदी’ असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button