RBI ने स्थानिक बँकांकडून मागितली अदानी समूहातील ‘एक्सपोजर’ची माहिती

RBI ने स्थानिक बँकांकडून मागितली अदानी समूहातील ‘एक्सपोजर’ची माहिती

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील स्थानिक बँकांकडून अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या 'एक्सपोजर'बद्दल माहिती मागवली  आहे. या बाबतचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सूत्रांनी ही माहिती दिल्‍याचे 'रॉयटर्स'ने नमूद केले आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग वित्त संशोधक संस्‍थेच्‍या अहवाल प्रकाशित झाल्‍यानंतर अदानी समूहातील शेअर्स कोसळत आहेत. या समुहाला १०० अब्‍ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आता अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी या 'एफपीओ'मध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाने स्‍पष्‍ट केले आहे.

एक्सपोजरबद्दल (Exposure) थोडक्यात….

RBI च्या एक्सपोजरमध्ये क्रेडिट एक्सपोजर आणि गुंतवणूक एक्सपोजर यांचा समावेश होतो. अदानी समूहाबाबतीत RBI ने घेतलेले कर्ज आणि गुंतवणूक या एक्सपोजरची माहिती देशांतर्गत स्थानिक बँकांकडून मागितली आहे. कंपनी गुतवणूकीत कंपन्यांचे शेअर्स आणि डिबेंचर, PSU बाँड आणि कमर्शियल पेपर्स (CPs) मधील गुंतवणूक या घटकांचा समावेश होतो.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news