

पुढारी ऑनलाईन: श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा काल सांगता समारंभ झाला. या समारंभाला राहुल गांधींसह देशातील काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. यानंतर आज देशाच्या संसदीय अर्थसंकल्पाचा समारंभ होत आहे. दरम्यान, खराब वातावरणामुळे विमानाचे उशिरा उड्डाण झाल्याने राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला काँग्रेस नेते उपस्थित राहू शकणार नाहीत; अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले आहे.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यानिमित्त आज ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहाला उद्देशून राष्ट्रपती अभिभाषण करणार आहेत. दरम्यान, श्रीनगर येथून काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच इतर अनेक काँग्रेस खासदार दिल्लीतील अधिवेशनासाठी उपस्थित राहणार होते. पण श्रीनगर विमानतळावरून विमानाचे उशिरा उड्डाण झाल्याने अधिवेशनाला पोहोचायला उशीर होणार असल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.