Attack Alert : पंजाबनंतर, दिल्लीतही खलिस्तानी स्लीपर सेल ॲक्टिव्ह; हल्ल्याचा अलर्ट | पुढारी

Attack Alert : पंजाबनंतर, दिल्लीतही खलिस्तानी स्लीपर सेल ॲक्टिव्ह; हल्ल्याचा अलर्ट

पुढारी ऑनलाईन: पंजाबनंतर आता दिल्लीत खलिस्तान स्लीपर सेल ॲक्टिव्ह झाला आहे. या सेलकडून राजधानी दिल्लीत हल्ला (Attack Alert) होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. खलिस्तानी स्लीपर सेलचे दहशतवादी नेटवर्क हे गेल्या काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआर भागात सक्रिय झाले आहे. त्यामुळे शहरात हल्ल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिल्याचे इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत सांगितले.

पश्चिम दिल्लीतील अनेक भागात खलिस्तान समर्थक पोस्टर्स आणि पेंट केलेली भित्तिचित्रे समोर आल्याच्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत. ज्यामुळे पोलीस देखील गोंधळात पडले आहेत. दिल्लीतील विकासपुरी, जनकपुरी, पश्चिम विहार, पीरागढी आणि पश्चिम दिल्लीच्या इतर भागांमध्ये आक्षेपार्ह घोषणांसह आढळलेली अनेक भित्तिचित्रे मोठ्या कटाचा भाग (Attack Alert) असू शकतात, असेही गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. त्यामुळे दिल्लीत खलिस्तानी स्लीपर सेल दहशतवादी हल्ले घडवू शकतात, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

स्थानिक पोलिसांकडून त्वरित कारवाई करत, शहरातील खलिस्तान समर्थक पोस्टर्स काढून टाकत भिंती पुन्हा रंगवण्यात आल्या आहेत. या कारणास्तव भारतीय दंड संहितेनुसार (IPC) दोन गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे (153-B) आणि गुन्हेगारीचा कट रचणे (120-B) या दोन कलमांतर्गत गुन्हा (Attack Alert) देखील दाखल करण्यात आला आहे.

या भागात पोलिसांकडून गस्त (Attack Alert) वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत, वेळोवेळी तपासले जात आहे. राजधानीतील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या खलिस्तानी संघटनांबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसही अलर्ट झाले आहेत.

हेही वाचा:

Back to top button