Congress Vs Adani : 'अदानी ग्रुप'ची चौकशी करा - हिंडनबर्ग अहवालानंतर जयराम रमेश यांची मागणी | पुढारी

Congress Vs Adani : 'अदानी ग्रुप'ची चौकशी करा - हिंडनबर्ग अहवालानंतर जयराम रमेश यांची मागणी

पुढारी ऑनलाईन : हिंडनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूहाविरोधातील नियम उल्लंघन आणि आर्थिक अनियमितता प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. या कथित आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची त्वरित सेबी आणि आरबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी शुक्रवारी (दि.२७) केली. मात्र, काँग्रेस आणि संबंधित नेते जयराम रमेश यांनी केलेले आरोप अदानी समूहाने फेटाळून लावले आहेत.

याविषयी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हिंडनबर्गने अदानी समूहाचे कटू सत्य सांगणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात अदानी समूहावर काही गंभीर खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी त्यांनी काँग्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारवर आरोप

याविषयी बोलताना जयराम रमेश यांनी अदानी समूह आणि सध्याचे सरकार यांच्यातील घनिष्ठ संबंध आम्हाला पूर्णपणे समजले असल्याचे स्पष्ट केले आहे. एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसने या आरोपांची चौकशी करण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. सेबी आणि आरबीआयला आर्थिक व्यवस्थेचे कारभारी म्हणून त्यांची भूमिका बजावण्यासाठी आणि मोठ्या सार्वजनिक हितासाठी आमची भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

सेन्सॉरशिप लागू करण्यासाठी, मोदी सरकार प्रयत्न करू शकते. परंतु भारतीय व्यवसाय आणि वित्तीय बाजारांच्या जागतिकीकरणाच्या युगात, कॉर्पोरेट ‘गैरप्रशासनावर’ वर लक्ष केंद्रित करणारा हिंडनबर्ग अहवाल ‘दुर्भावनापूर्ण’ म्हणून सहजपणे फेटाळला जाऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा :

Back to top button