Animal Video : एनिमलच्या सेटवरून रणबीर कपूरचा लूक व्हायरल | पुढारी

Animal Video : एनिमलच्या सेटवरून रणबीर कपूरचा लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणबीर कपूर लवकरच ‘तू झूठा मैं मक्कार’मध्ये दिसणार आहे. दरम्यान, त्याचा नवा लूक पाहायला मिळत आहे. (Animal Video ) त्याचा आगामी चित्रपट ‘एनिमलची’ही चर्चा आहे. ‘एनिमल’च्या सेटवरून एक धाकड व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये तो सूट-बूटमध्ये दिसतो आहे. ‘एनिमल’च्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झालाय. (Animal Video )

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट ‘तू झूठा मैं मक्कार’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यानंतर फॅन्सची उत्सुकता वाढली आहे. ‘तू झूठा मैं मक्कार’मध्ये श्रद्धा कपूर आणि रणबीरची केमिस्ट्री चांगली दिसत आहे. ‘एनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदाना असेल.

संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ सेटवरून रणबीर कपूरचा धाकड लूक पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. यामध्ये रणबीर नेवी ब्लू थ्री पीस सूट, लांब केस आणि दाढीमध्ये दिसत आहे.

फॅन्स हा लूक पाहून ‘गँगस्टर’च्या भूमिकेचा अंदाज लावत आहेत. काही युजर्सनी कमेंटदेखील केली आहे की, हा सीन किती चांगला वाटत आहे. लोकांनी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चा लूक पाहून चिंता व्यक्त केली. ‘एनिमल’मध्ये रणबीर कपूर कोणत्या भूमिकेत दिसेल, याविषयीची निर्मात्यांनी माहिती शेअर केलेली नाही.

रिलीज डेट

‘एनिमल’ ११ ऑगस्ट, २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याआधी रणबीर कपूरचा ‘तू झूठा मैं मक्कार’ चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट ८ मार्चला रिलीज होईल. याआधी रणबीर कपूर ब्रह्मास्त्रमध्ये दिसल होता, जो हिट चित्रपट ठरला होता. रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. तसेच तिने सिद्धार्थ आनंदच्या ‘मिशन मजनू’मध्ये काम केलं होतं.

Back to top button