एनसीसीच्या 75 व्या स्थापनादिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मुख्य कार्यक्रम दिल्लीत होईल. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' विषयावर एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 'वसुधैव कुटुम्बकम' चा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 19 देशांच्या अधिकारी आणि कॅडेटसना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.