iNCOVACC : स्‍वदेशी 'इंट्रानेजल कोविड' लसीच्या वापराला परवानगी | पुढारी

iNCOVACC : स्‍वदेशी 'इंट्रानेजल कोविड' लसीच्या वापराला परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंट्रानासल कोविड-19 लस इनकोव्हॅक लाँच करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केली होती. भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त iNCOVACC पहिली इंट्रानासल कोविड-19 लस लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लस लॉन्च केली. या लसीची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त लस लॉन्च करण्याची घोषणा केली होती. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारत बायोटेकने घोषणा केली होती की, सरकारला प्रति लस 325 रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना प्रति लस 800 रुपये दराने लस मिळणार आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने विकसित केली लस

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (WUSM) च्या सहकार्याने भारत बायोटेकने लस ही विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही कोरोनाची पहिली स्वदेशी लसही तयार केली होती. भारत बायोटेकने या नवीन लसीला iNCOVACC असे नाव दिले आहे. यापूर्वी तिचे नाव BBV154 असे होते. ही लस नाकाव्‍दारे दिली जाते.

6 सप्टेंबर रोजी, DGCI ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी आपत्कालीन वापरासाठी Intranasal COVID-19 लस Incovac ला मान्यता दिली होती. भारत बायोटेकने डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टरसाठी बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला होता. आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे की, ही लस बूस्टर म्हणून दिली जाईल.

हेही वाचा :

Back to top button