Arshad Warsi: मुन्नाभाई-सर्किटची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार | पुढारी

Arshad Warsi: मुन्नाभाई-सर्किटची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा एकदा सर्किट आणि मुन्नाभाई यांची जोडी पडद्यावर वापसी करण्यासाठी तयार आहे. अरशद वारसीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याविषयीची माहिती दिलीय. अरशद लवकरच संजय दत्तसोबत वापसी करण्यासाठी तयार आहे. (Arshad Warsi) मुन्नाभाई आणि सर्किट यांची जोडी खूप पसंतीस उतरली होती. चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये संजय दत्त आणि अरशद वारसीने दमदार भूमिका साकारल्या होत्या. दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते. आता पुन्हा एकदा सर्किट – मुन्नाभाई यांची जोडी पडद्यावर वापसी करण्यासाठी तयार आहे. अरशद वारसीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिलीय. (Arshad Warsi)

अरशद वारसीने दिली माहिती

अरशद वारसीने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले आहे- मी माझा भाऊ संजय दत्तसोबत एक आणि सुपर एंटरटेनिंग चित्रपटासोबत वापसी करत आहे. आमची प्रतीक्षा सर्वाधिक दीर्घकाळ लांबत आहे. या पोस्टासोबत त्याने सिद्धांत सचदेव, गौरव दुबे आणि थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्सलादेखील टॅग केलं आहे. त्यासोबत त्याने अद्याप चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेव करत आहे. हा चित्रपट यावर्षी चित्रपटगृहात रिलीज होईल.

या चित्रपटात दिसला होता अर्शद वारसी

अरशद वारसीची कॉमेडी फॅन्सना खूप आवडते. मग ती गंभीर भूमिका असो वा कॉमेडी भूमिका खूप उत्तमपणे तो साकारतो. संजय दत्तसोबत अर्शदची जोडी सर्वांनाच भावते. दोघे एकत्र २००६ मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटामध्ये विद्या बालनदेखील मुख्य भूमिकेत होती.

Back to top button