पुढारी ऑनलाईन : अमेरिकेमध्ये मंदीची लाट पसरल्यामुळे अनेक कंपन्यांनी टाळेबंदीची घोषणा (Google layoff) केली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन अशा दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये नुकतेच Google ने देखील तब्बल 12,000 कर्मचार्यांना काढून टाकले आहे. मात्र, कर्मचारी कपातीच्या संख्येवर कंपनीच्या एका गुंतवणूकदाराने असमाधान व्यक्त केले आहे. यानंतर Google चे गुंतवणूकदार ख्रिस होन यांनी गुगलमधील आणखी कर्मचा-यांच्या कपातीची मागणी करत, सुंदर पिचाई यांना सल्ला दिला आहे.
Google ची मूळ कंपनी अल्फाबेटमध्ये सुमारे ६ बिलियन डॉलर स्टेक असलेल्या ख्रिस होनने Google चे CEO सुंदर पिचाई यांना आणखी हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्याचा (Google layoff) सल्ला दिला आहे. कारण सध्याची कंपनीची संख्या ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याइतकी अजूनही कमी नसल्याचे या गुंतवणूकदाराने म्हटले आहे.
या गुंतवणूकदाराने पिचाई यांना पाठवलेल्या पत्रात, म्हटले आहे की, व्यवस्थापनाने सुमारे १ लाख ५० हजार पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी, ज्यासाठी Google ला अजून एकूण कर्मचार्यांपैकी २० टक्के जणांना काढून टाकावे (Google layoff) लागेल. कंपनीने याआधीच ६ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तरीही गुंतवणूकदाराने कंपनीला अजून १४ टक्के अधिक कर्मचारी कपात करण्याचा सल्ला सीईओ सुंदर पिचाई यांना दिला आहे.