Google Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटनं १२ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ | पुढारी

Google Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटनं १२ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलची पॅरेंट कंपनी असणाऱ्या अल्फाबेट इंक १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने स्टाफ मेमोमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात असल्याने टेक्नॉलॉजी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांना नारळ देण्यााच्या या निर्णयाचा कंपनीतील सर्वांवर प्रभाव पडणार आहे. यामध्ये कॉर्पोरेटसोबतच अभियांत्रिकी आणि उत्पादनाशी निगडीत टीमचाही समावेश आहे. (Google Alphabet)

गुगलने याबाबत म्हटले आहे की, जगभरात नोकरकपात करण्यात येत आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांवर याची टांगती तलवार असणार आहे. ही बाब आर्थिक अनिश्चिततेचा काळ सुरू असताना आणि टेक्नॉलॉजीमध्ये मोठे बदल होत असताना समोर आली आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्या कृत्रीम बुद्धीमत्तेसाठी ओळखल्या जातात. (Google Alphabet)

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक नोटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पुढील काळासाठी केलेले नियोजन, आमचे उत्पादन आणि सेवांचे मूल्य आणि सुरूवातीपासून आम्ही केलेली गुंतवणूक यामुळे पुढील काळात निर्माण करणाऱ्या संधीबद्दल मला खात्री आहे. (Google Alphabet)

हेही वाचंलत का?

Back to top button