

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने 'धनगरी नृत्य' या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक झारखंडने पटकावले. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी झाले होते.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षीच्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील 'व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट्स' या लोककला समूहाने धनगरी या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला होता.