

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने घटत आहे. रविवारी दिवसभरात केवळ ९४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये या कोरोना मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता १ हजार ९३४ पर्यंत तर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ८२ हजार १५ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४९ हजार ३४६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ७३५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८१ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.११ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.०८ टक्के नोंदवण्यात आला. देशात गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत २६ ने घट नोंदवण्यात आली आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.१० कोटी डोस लावण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का ?