Corona Positivity Rate : २०२० नंतर पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक कमी | पुढारी

Corona Positivity Rate : २०२० नंतर पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक कमी

नवी दिल्ली, १७ जानेवारी, पुढारी वृत्तसेवा, Corona Positivity Rate : देशात मार्च २०२० नंतर सर्वाधिक कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद सोमवारी घेण्यात आली. सोमवारी दिवसभरात फक्त ८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजार ३५ पर्यंत घटली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ४६ लाख ८१ हजार २३३ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४८ हजार ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ७२६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
Corona Positivity Rate : मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.०५% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.०९% नोंदवण्यात आला. दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ८४ ने घट नोंदवण्यात आली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.१७ कोटी डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हे ही वाचा :

Back to top button