Corona Update : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; दिवसभरात ११४ रुग्णांची भर | पुढारी

Corona Update : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; दिवसभरात ११४ रुग्णांची भर

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Update ) सौम्य घट नोंदवण्यात आली. रविवारी दिवसभरात ११४ कोरोनाबाधितांची भर पडली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ४६ लाख ८१ हजार १५४ पर्यंत पोहचली आहे. तर, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ११९ झाली आहे. दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ३० ने घट नोंदवण्यात आली. दरम्यान देशातील कोरोनामृत्यूची संख्या ५ लाख ३० हजार ७२६ पर्यंत पोहोचली आहे. (Corona Update )

सोमवारी देशाचा कोरोना मुक्तीदर ९८.८०% आणि कोरोना मृत्यूदर १.१९% नोंदवण्यात आला. देशातील ४ कोटी ४१ लाख ४८ हजार ३०९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.१७ कोटी डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  हेही वाचा :

Back to top button