Swati Maliwal: माझ्याबद्दल खोटे बोलून मला घाबरवलं जातय, जिवंत असेपर्यंत लढत राहीन- स्वाती मालीवाल | पुढारी

Swati Maliwal: माझ्याबद्दल खोटे बोलून मला घाबरवलं जातय, जिवंत असेपर्यंत लढत राहीन- स्वाती मालीवाल

पुढारी ऑनलाईन: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ( DCW chief Swati Maliwal ) यांचा विनयभंग झाल्‍याची घटना आज ( दि. १८ ) पहाटे घडली. या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद उमटले. काहींनी तर हे फेक आणि खोटे असल्याचे म्हटले. पण यावर मालीवान यांनी भडकून ‘मी जिवंत असेपर्यंत लढत राहीन, असे ट्विट करत अगदी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाती मालीवाल यांनी या व्हिडिओला खोटे म्हणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी या गोष्टीला गलिच्छ आणि खोटे म्हणाऱ्यांना ट्विट करत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, काहींना वाटते की, ते माझ्याबद्दल घाणेरडे खोटे बोलून मला घाबरवतील. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, या छोट्या आयुष्यात मी डोक्यावर कफन बांधून अनेक मोठी कामे केली आहेत. माझ्यावर अनेकदा हल्ले झाले पण मी थांबले नाही. प्रत्येक अत्याचाराने माझ्यातील आग आणखीनच प्रबळ होत गेली आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. मी जिवंत असेपर्यंत लढत राहीन!” असा इशारा स्वाती मालीवाल यांनी तिच्यावर शाब्दिक वार करणाऱ्यांना दिला आहे.

गुरुवारी पहाटे स्‍वाती मालीवाल या आपल्‍या टीम सोबत दिल्‍ली शहरातील रात्री महिलांच्‍या सुरक्षा परिस्‍थितीचा आढावा घेण्‍यासाठी गेल्‍या होत्‍या. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)रुग्णालयाच्‍या गेट क्रमांक दोनवर पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी त्‍या पोहोचल्‍या. यावेळी त्‍याच्‍याबरोबर असणारी टीम काही अंतरावर होती. स्‍वामी मालीवाल रस्‍त्‍यावर एकट्याच उभ्‍या होत्‍या.

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असणारा कारचालक त्‍यांच्‍याजवळ आला. त्‍याने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यांनी प्रतिकार करत त्‍याला पकडण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी त्‍याने मालीवाल यांना १० ते १५ मीटर फरफटत नेले. दरम्‍यान, या प्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय कार चालकाला अटक केली आहे. या घटनेची माहिती मालीवाल यांनी ट्विटच्‍या माध्‍यामातून दिली. दरम्‍यान, या प्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय कार चालकाला अटक केली आहे. या घटनेची माहिती मालीवाल यांनी ट्विटच्‍या माध्‍यामातून दिली आहे.

हे ही वाचा :

इथे वय वाढत नाही..जाणून घ्या ‘शांगरी-ला’…दरीचे रहस्य!

Women’s Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘स्वाती मालिवाल’ यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

Back to top button