नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ( DCW chief Swati Maliwal ) यांचा विनयभंग झाल्याची घटना आज ( दि. १८ ) पहाटे घडली. कार चालकाने त्यांना सुमारे १५ मीटरपर्यंत फरफटत नेले. 'एम्स'च्या गेट क्रमांक दोनसमोर हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय कार चालकाला अटक केली आहे. या घटनेची माहिती मालीवाल यांनी ट्विटच्या माध्यामातून दिली आहे.
गुरुवारी पहाटे स्वाती मालीवाल या आपल्या टीम सोबत दिल्ली शहरातील रात्री महिलांच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा
घेण्यासाठी गेल्या होत्या. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोनवर पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी त्या पोहचल्या. यावेळी त्याच्याबरोबर असणारी टीम काही अंतरावर होती. स्वामी मालीवाल रस्त्यावर एकट्याच उभ्या होत्या. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणार्या कारचालक त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यांनी प्रतिकार करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मालीवाल यांना १० ते १५ मीटर फरफटत नेले.
या घटनेची माहिती देणार्या ट्विटमध्ये मालीवाल यांनी म्हटलं आहे की, "काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. या वेळी एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला आणि जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात कारच्या आरशात बंद केला आणि मला ओढले. देवकृपेने माझा जीव वाचवला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा."
हेही वाचा :