सांगली : शासनाने धरणग्रस्तांच्या जमीनीबाबत नोटीसा काढल्याने नागरीकांनी थेट तहसील कार्यालयात मांडला ठिय्या | पुढारी

सांगली : शासनाने धरणग्रस्तांच्या जमीनीबाबत नोटीसा काढल्याने नागरीकांनी थेट तहसील कार्यालयात मांडला ठिय्या

इस्लामपूर (सांगली), पुढारी वृत्तसे‍वा : शासनाने धरणग्रस्तांना जमीनीच्या लाखो रुपयांच्या थकीत कब्जेहक्काची रक्कम व १२ टक्के व्याज भरण्याच्या नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसा रद्द कराव्यात तसेच धरणग्रस्तांच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी सोमवारी धरणग्रस्तांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

दरम्‍यान, मागण्या मान्य होईपर्यंत मंगळवारी दिवसभर धरणग्रस्त रस्त्यावरच ठिय्या मारुण बसले होते. धरणग्रस्त आपल्या मागण्यासाठी सोमवारपासून तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करत होते. दरम्‍यान, मंगळवारी संतप्त चांदोली धरणग्रस्त थेट तहसील कार्यालयात घुसले. त्यामुळे प्रशासन व पोलीसांची धावपळ उडाली. शेकडो धरणग्रस्तांनी तहसील कार्यालयाच्यातळ मजल्यावरच ठिय्या मांडला.

हेही वाचा 

Back to top button