Gold rate : सोन्‍याच्‍या दराला झळाळी! जाणून घ्या आजचा प्रति तोळा दर | पुढारी

Gold rate : सोन्‍याच्‍या दराला झळाळी! जाणून घ्या आजचा प्रति तोळा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने दरातील तेजी आजही ( दि. १७) कायम राहिली. एक तोळे सोन्‍यासाठी 56,438 रुपयांवर व्यवहार झाले. चांदीच्या फ्युचर्समध्ये ही अशीच घसरण झाली असून 0.21 टक्क्यांनी घसरून 69, 642 रुपयांवर व्यवहार केला. मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट आणि 24-कॅरेट सोन्याच्या किरकोळ किमतीत अनुक्रमे 52,200 रुपये आणि 56,950 रुपये इतकी वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर (Gold rate) मंगळवारी २१० रुपयांनी वाढून 56,950 रुपयांवर गेला. तर 22 कॅरेटचा दर 52,200 रुपयांवर पोहोचला. 22 कॅरेटच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलोग्राम चांदीचा किरकोळ दर 72,900 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी नोंदलेल्या दराच्या तुलनेत यात 150 रुपयांनी वाढ झाली आहे.चेन्नईमध्ये सोने सर्वात महाग झाले आहे. तिथे 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 53,170 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेटचा दर 58,000 रुपये इतका झाला आहे.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 57,100 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेटचा दर 52,350 रुपयांवर पोहोचला आहे. बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 57,000 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 52,250 रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button