Gold Prices Today | सोन्याचा दर पुन्हा सर्वकालीन उच्चांकाजवळ, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर | पुढारी

Gold Prices Today | सोन्याचा दर पुन्हा सर्वकालीन उच्चांकाजवळ, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

Gold Prices Today : ऐन लग्नसराईत सोन्याचा दर पुन्हा सर्वकालीन उच्चांकाजवळ पोहोचला आहे. आज शुक्रवारी (दि.१३) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५६,२५४ रुपयांवर गेला. काल गुरुवारी सोन्याचा दर ५६,०९७ रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याचा दर १५७ रुपयांच्या तेजीने खुला झाला. याआधी सोन्याने ५६,२५९ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. आता पुन्हा सोने सर्वकालीन उच्चांकाजवळ पोहोचले आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५६,२५४ रुपये, २३ कॅरेट ५६,०२९, २२ कॅरेट ५१,५२९ रुपये, १८ कॅरेट ४२,१९१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३२,९०९ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर ११५ रुपयांनी कमी होऊन प्रति किलो ६७,८४८ रुपयांवर खुला झाला आहे. कालच्या व्यवहारात चांदीचा दर ६७,९६३ रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. अमेरिकेत सोन्याचा दर प्रति औंस १,८९५ डॉलरवर आहे. सोन्याच्या दरात ३.०२ डॉलरने घसरण झाली आहे. तर चांदीचा दर ०.१५ डॉलरने घसरून प्रति औंस २३.६६ डॉलरवर आला आहे.

का महाग होत चालले आहे सोने?

देशातील प्रत्येक शहरात सोन्या-चांदीच्या दरात फरत असतो. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर करमुक्त असतात. त्यामुळे देशातर्गंत बाजारातील दरांमध्ये तफावत असते. कमकुवत झालेला डॉलर आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या कमी व्याजदरवाढीच्या अपेक्षेने सोन्याचे दर वाढले आहेत. (Gold Prices Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button